भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानविज्ञान हरि । नांदे आमुच्या घरीं । बाह्यजु अभ्यंतरी जाला देव

dnyanavidnyan hari | nande amuchya gharin | bahyaju abhyantari jala dev

ज्ञानविज्ञान हरि । नांदे आमुच्या घरीं । बाह्यजु अभ्यंतरी जाला देव ॥१॥ काय सांगूं माय । त्रिभुवन धाय । पाहातां न समाय । नाना रुपीं ॥ध्रु०॥ चढत्या वाढत्या गोष्टी । प्रगट दिसे घटीं । नामरुपें वैकुंठीं । नेऊनि घाली रया ॥२॥ ज्ञानदेवा गोडी । हरिपदीं आवडी । प्रवृत्तीची थडी । उलंडिली ॥३॥