भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेवापुढें कथा । करी वारील ह्या व्यथा

dnyanadevapudhen katha | kari varil hya vyatha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेवापुढें कथा । करी वारील ह्या व्यथा ॥१॥ आत्मरूपीं ज्ञानेश्वर । तोचि ज्ञानाचा सागर ॥२॥ ज्ञानदेवीं धरी भाव । स्वयें होय तूंचि देव ॥३॥ राम कृष्ण रे गोविंद । जप म्हणे तो मुकुंद ॥४॥