भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेवी आन नाही ते भिन्न

dnyanadevi an nahi te bhinna

रचनाकार: संत सोपान · अभंग
ज्ञानदेवी आन नाही ते भिन्न । प्रपंचाचे भरण तेथे नाही ॥१॥ स्वरूपाची खूण होऊनी सफळ । भोगी सर्वकाळ चित्सत्ता ॥२॥ आत्मापरमात्मा भेदाभेद द्वंद्ध । एकतत्त्व अभेद जनी वनी ॥३॥ सोपान दीप दिपी ते जीवन । तयामाजी जीवन एक झाले ॥४॥