भजनी मालिका

भजने

ग्रामाचे बाहेरी येवोनि श्रीहरी । सुदाम्यासी भेटुनी करी समाधान ॥१॥ जोडोनियां हात विनवी सुदामा । पूर्ववत प्रेमा असों द्यावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घटीं अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घन:श्याम मूर्ति राजीवलोचन । सांठवलें त्रिभुवन उदरामाजी ॥१॥ कौस्तुभ पदकें तुळसीमाळा कंठी । कास हे गोमटी पीतांबरें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घनाःश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा शोभे बहु ॥१॥ कस्तुरी मळवट चंदनाची उटी । बाहुवटे कंठी गोरेपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं राउळीं गेला ॥१॥ पायांवर भाळ ठेवुनी तत्वतां । म्हणे पंढरीनाथ सांभाळिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥ नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा