भजनी मालिका
← भजनांकडे परत

घडो त्याचा समागम । ज्याचें प्रेम विठठलीं

ghado tyacha samagam | jyachen prem vithathalin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घडो त्याचा समागम । ज्याचें प्रेम विठठलीं ॥१॥ सहज त्याच्या ऐकतां गोठी । परमार्थ पोटीं दृढावे ॥२॥ अनुतसपासी दुणीव चढे । वैराग्य वाढे चढोवढी ॥३॥ निळा म्हणे वाढे भाव । संचरे स्वानुभव निजांगीं ॥४॥