भजनी मालिका
← भजनांकडे परत

ग्रामाचे बाहेरी येवोनि श्रीहरी । सुदाम्यासी भेटुनी करी समाधान

gramache baheri yevoni shrihari | sudamyasi bhetuni kari samadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ग्रामाचे बाहेरी येवोनि श्रीहरी । सुदाम्यासी भेटुनी करी समाधान ॥१॥ जोडोनियां हात विनवी सुदामा । पूर्ववत प्रेमा असों द्यावा ॥२॥ एका जनार्दनीं बोलोनियां ऐसें । तांतडी निघतसे क्रमीत मार्ग ॥३॥