भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी

gharadar vokhaten tyajun mhanasi tari

घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी शरीरा येवढें जाड । मायबाप वोखटी त्यजूं म्हणसी तरी अहंकार अविद्येचें कोड ॥ बंधु सखे त्यजूं म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड । बहिणी पाठीच्या त्यजूं म्हणसी आशा तृष्णा माया अवघड रया ॥१॥ त्यजिलें तें काय कासया म्हणिजे सांग पा मजपांशीं ऐसें । जया भेणें तूं जासी वनांतरा तें तंव तुजचि सरिसें रया ॥२॥ स्त्रीं वोखटी त्यजूं म्हणसी तरी कल्पने येवढी भोगती । पुत्र अपत्य त्यजूं म्हणसी तरी इंद्रियांसि नाहीं निवृत्ति । सकळ गणगोत त्यजूं म्हणसी तरी हे अष्टधा प्रकृति । आवघेंचि त्यजूं पाहे म्हणसी तरी मना नाहीं निज शांति रया ॥३॥ अवघींचि तुज जवळी दुमदुमित असतां वरीवरी मुंडिसी कां करिसी विटंबना । सहज संतोषें असोनि तैसा जैसा परि तो सदगुरु पाविजे खुणा । आपुले आश्रमीं स्वधर्मीं असतां सर्वत्र एकुचि जाणा । बापरखुमादेविवरुविठ्ठलु इतुकिया साठीं नेईल वैकुंठभुवना ॥४॥