भजनी मालिका
← भजनांकडे परत

घडती पुण्याचियां रासी । जे पंढरीसी जाती नेमे

ghadati punyachiyan rasi | je pandharisi jati neme

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घडती पुण्याचियां रासी । जे पंढरीसी जाती नेमे ॥१॥ घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरुशन पुडंलीक ॥२॥ पाहता विटेवरी जगदीश । पुराणपुरुष व्यापक ॥३॥ वारकारी गाती सदा । प्रेमें गोविंदा आळविती ॥४॥ तया स्थळीं मज ठेवा । आठवा जनीं जनार्दन ॥५॥