भजनी मालिका

भजने

कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी । कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जातां सन्मुख देखे हरी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी ॥१॥ वारिलें संकट भक्तांचा अंकित । धांवेचि त्वरित नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥ कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगें ॥१॥ वनीं बैसोनियां धरोनी विश्वास । आळवावा ईश ऐसें चित्तीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केला पुढें हरी अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥ थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिली बंधनें बहुतांची ॥१॥ जिही उच्चारिलें अनुतापें नाम । त्यांचे जन्ममरण निवारिलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥ तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥ जेथें राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ