भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णें वेधली विरहिणी बोले

krushnen vedhali virahini bole

कृष्णें वेधली विरहिणी बोले । चंद्रमा करितो उबारागे माये । न लवा चंदनु न घाला विंजणवारा । हरिविणें शून्य शेजारुगे माये ॥१॥ माझे जिवींचे तुम्हीं कां वो नेणा । माझा बळिया तो पंढरीपणा वो माये ॥२॥ नंदनंदनु घडी घडी आणा । तयाविण न वचति प्राण वो माये ॥ रखुमादेविवरु विठ्ठ्लु गोविंदु । अमृतपानगे माये ॥३॥