भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिली बंधनें बहुतांची

kela pratipaksha apulya abhimanen | todili bandhanen bahutanchi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिली बंधनें बहुतांची ॥१॥ जिही उच्चारिलें अनुतापें नाम । त्यांचे जन्ममरण निवारिलें ॥२॥ कोणीये यातीचा हो कां कोणी । एका केलें कवतुक त्याचें तुम्ही ॥३॥ निळा म्हणे सजना जातीचा कसाई । रंका बंका तोहीं उध्दरिला ॥४॥