भजनी मालिका

भजने

कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥ भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥ चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिर नेणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥१॥ ग्वाही बहुतांची घालूनियां वरी । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया वांचूनि झालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥१॥ जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया व्हावें आम्ही जीवन्मुक्त । सांडुनियां थीत प्रेमसुख ॥१॥ वैष्णवांचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असो सुखी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया साधन तपाचिया हावा । पाचरितां धावो येतो लवलाही ॥१॥ ऐसा अंकिला धांवे वचनासाठीं । पहा जगजेठी भक्तकाजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥१॥ मग तळमळ न करितें मन । झालें तें कारण कळों येतें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कासयासी मूढा करिती संसार । पुढें तो अघोर थोर आहे ॥१॥ बळेंचि कां रे नागवासी पाहतां । विषयभोग भोगितां दुःख बहु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं ॥१॥ सोपा रे मंत्र राम अक्षरें दोनी । जपतां चुके आयणी चौर्‍यांशीची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कांसवीची पिलीं राहाती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय ॥१॥ जैसा जावळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कासवीचे दृष्टी जें येईजे भेटी । तैं अमृताची वृष्टि घडे त्यासी ॥१॥ तैसें हें भजन श्रीरामा वें ध्यान । वाचे नारायण अमृत-मय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कासाविस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण ॥१॥ दाही दिशा वोस वाटती उदास । करिताती सोस मनामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कासियाचीं बिजें घडलीं । लावणी केली वृक्ष तृणा ॥१॥ नेणवें महिमा तुमचा देवा । देवा मानवा दानवासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥ उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम