भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावें विण

kasaya pashan pujitasa pital | ashta dhatu khal bhaven vin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥ भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥ काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥२॥ काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥ काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धि ते ॥४॥ तुका म्हणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥५॥