भजनी मालिका

भजने

काळ जवळचि उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥ कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी । जंव तो आहे काळ दूरी ‌ मायाजाळी गूंतले मन।

रचनाकार: संत रामदास

काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥ युक्त आहार वेहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥ लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काळवेळ नसे नामसंकीर्तनी । उंच नीच योनी हेंहि नसे ॥१॥ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काळा गे दादुला पाहतां आकळू । तो झाला गोवळू नंदाचा ॥१॥ काळागे दादुला काळागे दादुला । पंढरीं पहा चला विठ्ठलगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काळा च सारिखीं वाहाती नक्षत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥ ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥ विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥ सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम