भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळवेळ नसे नामसंकीर्तनी । उंच नीच योनी हेंहि नसे

kalavel nase namasankirtani | unch nich yoni henhi nase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काळवेळ नसे नामसंकीर्तनी । उंच नीच योनी हेंहि नसे ॥१॥ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥२॥ कृपाळू कोंवसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी ॥३॥ नामा म्हणे फार सोपें हें साधन । वाचे नाम घेणें इतुकेंचि ॥४॥