भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळ जातो क्षणक्षणा

kal jato kshanakshana

रचनाकार: संत रामदास · अभंग
काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा काहीं धांवाधांव करी । जंव तो आहे काळ दुरी मायाजाळीं गुंतलें मन । परि हें दु:खासि कारण सत्य वाटतें सकळ । परि हें जातां नाहीं वेळ रामींरामदास म्हणें । आतां सावधान होणें।