भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचिये लेख नाहीं ब्रह्मा विष्णु मुख्य

kalachiye lekh nahin brahma vishnu mukhya

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
काळाचिये लेख नाहीं ब्रह्मा विष्णु मुख्य ॥१॥ युगा एक लव झडे। तोही न सरे काळापुढें ॥२॥ अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ||३॥ महीपाल स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥ वर्म चुकली बापुडीं । दासी जनी विठ्ठल जोडी ||५|