भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला

kasaya lagala yasi chaughachar | mulincha vevhar nivadila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥१॥ ग्वाही बहुतांची घालूनियां वरी । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥ तुम्हां वेगळ्या आपुल्या ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥२॥ भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥३॥ ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नाहीं सत्ता तुज देवा ॥४॥ तुका म्हणे वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥५॥