भजनी मालिका

भजने

उपवास पारणें न लगे । आणिक साधन । नामापरतें निधान नाहीं जगीं ॥१॥ म्हणोनि सांडी सांडी काम परतें । वाचेसी आरुतें नाम जपें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उपवास पारणें न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी ॥१॥ आम्हां विष्णुदासा कळलेंसे वर्म । मुखीं गावें नाम हातीं टाळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उपाधि निर्मळ शोभती चरण । नादबिंदु पूर्ण मध्य-भागीं ॥१॥ कदंबावरती चढे वनमाळी । शोभती निढळा ऊर्ध्वपुं‍ड्र ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तूं या निःशेष सांडीं बापा ॥१॥ सर्वांठायीं देव जगीं तो भरला । व्यापूनियां ठेला जळीं स्थळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं ॥१॥ ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उपाधीच्या नांवें घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणें काय बोलुं ॥१॥ टाकूनिइयां संग धरियेला देव । आतां तो उपाय दुजा नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उपायाच्या करितां श्रेणी । परि जेथ कोणी न पवेचि ॥१॥ तया पावविलों ठायां । संतीं करुनियां निज कृपा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥१॥ पुरवीं वासना साच सर्वजाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली ॥१॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम