भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं

upadhivegale tumhi nirvikar | kanhin cha sansar tumhan nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं ॥१॥ ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥ निस्संग तुम्हांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥२॥ तुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥