भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तूं या निःशेष सांडीं बापा

upadhi ya nanv bhutancha to dvesh | to tun ya nihshesh sandin bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तूं या निःशेष सांडीं बापा ॥१॥ सर्वांठायीं देव जगीं तो भरला । व्यापूनियां ठेला जळीं स्थळीं ॥२॥ काम अकाम सकाम निष्काम । हे सोपें उपाय साधकांसी ॥३॥ आसन ध्यान धारण तें ध्येय । हे सोपे उपाय साधकांसी ॥४॥ दंडन मुंडन नको तीर्थाटन । एका जनार्दन हृदयीं धरीं ॥५॥