भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपायाच्या करितां श्रेणी । परि जेथ कोणी न पवेचि

upayachya karitan shreni | pari jeth koni na pavechi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उपायाच्या करितां श्रेणी । परि जेथ कोणी न पवेचि ॥१॥ तया पावविलों ठायां । संतीं करुनियां निज कृपा ॥२॥ ज्याचे प्राप्ती लागीं योगी । धांवती मागीं सुषुम्नेच्या ॥३॥ निळा म्हणे सिध्द मुनीं । ज्यांतें अनुदिनीं चिंतिती ॥४॥