भजनी मालिका

भजने

येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥ येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥

येई वो येई वो येई धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥

बाबा अहंकार निशीं घनदाट । गुरु वचनीं फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट । तिनें मार्ग दविला चोखटगा ॥१॥ नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ॥ध्रु०॥