भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोल अबोलणे बोले

bol abolane bole

बोल अबोलणे बोले । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥ वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान पुण्य करा । जाब नेदा तरी जातों माघार गा ॥ध्रु.॥ हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥ मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥ काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी वसवसी। भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥ ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥