भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाबा ममतानिशि अहंकार दाट

baba mamatanishi ahankar dat

बाबा ममतानिशि अहंकार दाट । रामनामें वासुदेवीं वाट । गुरु कृपा वोळलें वैकुंठ । तेणें वासुदेवो दिसे प्रगटगा ॥१॥ वासुदेवा हरि वासुदेवा हरि । रामकृष्ण हरि वासुदेवा ॥२॥ आला पुंडलिक भक्तराज । तेणें केशव वोळला सहज । दिधलें विठ्ठलमंत्र बीज । तेणें जालें सर्व काजगा ॥३॥ रामकृष्णवासुदेवें । वासुदेवीं मन सामावेगा ॥४॥ शांतिक्षमादयापुरीं । वासुदेवो घरोघरीं । आनंदे वोसंडे अंबरी प्रेमे डुलें त्रिपुरारिगा ॥५॥ वासुदेवीं वाहूनि टाळी । पातकें गेलीं अंतराळीं । वासुदेवो वनमाळी । कीर्तन करुं ब्रह्ममेळींगा ॥७॥ ज्ञानदेवा वासुदेवीं । प्रीति पान्हा उजळी दिवी । टाळ चिपळी धरुनि जिवीं । ध्यान मुद्रा महादेवींगा ॥८॥