भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाबा अहंकार निशीं घनदाट

baba ahankar nishin ghanadat

बाबा अहंकार निशीं घनदाट । गुरु वचनीं फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट । तिनें मार्ग दविला चोखटगा ॥१॥ नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ॥ध्रु०॥ रेक बोल सुपष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा । संत समागमु धरावा । तेणें ब्रम्हानंद होय आघवागा ॥२॥ आला सीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झालें शरीरा । फिटला पातकाचा थारा । कळीकाळासी धाक दरारागा ॥३॥ अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळुगा ॥४॥