भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासुदेव स्मरण पापहरणाचे मूळ

vasudev smaran papaharanache mul

वासुदेव स्मरण पापहरणाचे मूळ । तीर्थांचे माहेर ब्रह्मव्यापक निश्चळ । अघनाशी मुखीं स्मरता वाचा झाली निर्मळ । त्रिविधताप शोषुनी रूपीं स्वरूपी सुमंगळ ।।१।। ॐ नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ।। धृ.।। जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे । तीर्थ व्रत यम नेम नलगे दैवता धरणें। आसनमुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे। केशव माधव अच्युत वदतां होय पातक हरणे ।।२।। शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग। गुदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग। ऊर्ध्व वायूचा श्वेतु तोडोनी करि वो वनभंग। ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग ।।३।। मनोजय वासना तोडोनी केली बीमोडी। मनीपूर नगर पहातां दुर्गति मोडी। काम क्रोध मद मत्सर अहंकार झोडी। अखंड परमानंद सेवूनि उभवी गुढी ।।४।। भेदभाव तोडोनियां घेतला प्रेमाचा गरळा। शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा। हरिस्मरणाचेनी बळे अंकित केले कळिकाळा । एका जनार्दनी अखंड सुखसोहळा ।।५।।