भजनी मालिका

भजने

साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥ पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधनाच्या माजी एक गजरातू । साधी त्यासी उजू होय पहा ॥१॥ नासिकाचें वारें कोंडोनियां प्राणें । उपराटें जाणें ऊर्ध्वपंथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

साधनांत सोपें नाम हें केवळ । याविण सकळ शीण वायां ॥१॥ धरी रे धरा नाम विठोबाचें । तेणें अज्ञानाचें मूल नासे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

साधनें आमुचीं आज्ञेचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥१॥ प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधनें कासया करसी रे गव्हारा । चौर्‍यांयशींचा फेरा चुकवी कांहीं ॥१॥ वाउगेंचि माझें म्हणोनि घेशी वोझें । आदी अंती तुझें कोण होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साधावया स्वरुपसिद्धी । सिद्ध साधका समाधी । बैसोनि ध्यानस्थ बुद्धी । परी तो हरी न सांपडे ॥१॥ धन्य धन्य वैष्णवसंग । खेळे तेथे पांडुरंग । कीर्तनीं नाचतसे स्वयंभ । सदा काळ सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधिता साधन योगी शिणताती । तेथें तुझी मति काय बापा ॥१॥ उलट पालट न करी गोल्हाट । आहे तोचि नीट पाहे बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ