भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण

sadhava to dev sarvasvachesathi | prarabdha tuti kriyaman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥ जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥२॥ तुका म्हणे निज भोगईल निजता । नाहीं होईल सत्ता दुजियाची ॥३॥