भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधिता साधन योगी शिणताती । तेथें तुझी मति काय बापा

sadhita sadhan yogi shinatati | tethen tujhi mati kay bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधिता साधन योगी शिणताती । तेथें तुझी मति काय बापा ॥१॥ उलट पालट न करी गोल्हाट । आहे तोचि नीट पाहे बापा ॥२॥ पंचाग्नी साधन धूम्रपान यज्ञ । आहे तो संपूर्ण उभा बापा ॥३॥ साधन खटपट वाउगा तो बोभाट । एका जनार्दनी नीट उभा बापा ॥४॥