भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधावया आत्मसुख । तें हे विटेवरी देख

sadhavaya atmasukh | ten he vitevari dekh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साधावया आत्मसुख । तें हे विटेवरी देख ॥१॥ नको जाऊं परदेशीं । वास करी पंढरीसी ॥२॥ भाव धरी बळकट । मुखीं नाम येकनिष्ठ ॥३॥ नामा म्हणे गोणाबाई । सर्व सुख याचे पायीं ॥४॥