भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधावया स्वरुपसिद्धी । सिद्ध साधका समाधी । बैसोनि ध्यानस्थ बुद्धी । परी तो हरी न सांपडे

sadhavaya svarupasiddhi | siddha sadhaka samadhi | baisoni dhyanastha buddhi | pari to hari na sampade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधावया स्वरुपसिद्धी । सिद्ध साधका समाधी । बैसोनि ध्यानस्थ बुद्धी । परी तो हरी न सांपडे ॥१॥ धन्य धन्य वैष्णवसंग । खेळे तेथे पांडुरंग । कीर्तनीं नाचतसे स्वयंभ । सदा काळ सर्वदा ॥२॥ घेतां नाम धांवे विठ्ठल । नको तप नको मोल । न लगती कष्ट बहुसाल । तो कृपाळु दीनांचा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । भक्तीस तुष्टें नारायन । त्यांचे करितां चिंतन । आपोआप येतसे ॥४॥