भजनी मालिका

भजने

आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥१॥ काय सांगों जालें कांहींचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आनंदाच्या ताटीं अमृताची वाटी । विवेकतारुं घोटी रसनाबळें ॥१॥ तें हें रुपडें रुपस विठ्ठल । पुंडलिकें बहु साल प्रार्थियलें ॥ध्रु०॥

आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥१॥ गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आनंदें करुनी संसारीं असावें । नाम आठवावें श्रीरामाचें ॥१॥ नामाचियां योगे संसार तो चांग । येरव्हीं तें अंग व्यर्थ जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥ मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग कळिकाळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आनंदें निर्भर नाम गावें वाचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥ नामाचें सामर्थ्य कळिकाळ वंदी माथां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनंदें वनांत खेळताती गोप । गायीचे कळप चर-ताती ॥१॥ अकस्मात दैत्य देखती दुरोनी । म्हणती विघ्न थोर आलें कृष्णीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥ विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आनु नेणें कांहीं । विठ्ठलु स्मरें देहभावीं ॥१॥ पुंडलिका हें चिंतन । म्हणोनि विटेवरि हें ब्रह्म ॥२॥

आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारीं उभ जेथें ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । दोषा जातीं भंगा नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥ मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥ मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले अवयव आवरीतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आप तरे त्याकी कोण बऱ्हाई । औरनकुं भलो नाम धराई ॥ध्रु.॥ काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम