भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदें वनांत खेळताती गोप । गायीचे कळप चर-ताती

ananden vanant khelatati gop | gayiche kalap char-tati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आनंदें वनांत खेळताती गोप । गायीचे कळप चर-ताती ॥१॥ अकस्मात दैत्य देखती दुरोनी । म्हणती विघ्न थोर आलें कृष्णीं ॥२॥ लपें तूं कान्होबा म्हणताती गडी । घाडितो वोंगडी तुजवरी ॥३॥ वाबरले तेव्हां समस्त गोपाळ । पाहोनी धननीळ बोलतसे ॥४॥ तुम्ही कांहीं चिंता न करा मानसीं । मा-रितों मी यासी क्षणामाजीं ॥५॥ राहोनियां उभा पाहात अंतरी । यासी मृत्यु करीं कोणा़चिया ॥६॥ वातात्मजा हातीं मरण असे यासी । कळलें देवासी नामा म्हणे ॥७॥