भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदें करुनी संसारीं असावें । नाम आठवावें श्रीरामाचें

ananden karuni sansarin asaven | nam athavaven shriramachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनंदें करुनी संसारीं असावें । नाम आठवावें श्रीरामाचें ॥१॥ नामाचियां योगे संसार तो चांग । येरव्हीं तें अंग व्यर्थ जाय ॥२॥ ऋषी मुनी सिद्ध संत महानुभाव । रामनामें भवा सुखें केला ॥३॥ नामें होयसुख असुअख नामे निरसें दुःख । रामनाम एक हृदयीं धरा ॥४॥ एका जनार्दनी नामाचा आठव । सुखदुःख भाव दुराविला ॥५॥