भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें

anandache dohin anandatarang | anand chi ang anandachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥१॥ काय सांगों जालें कांहींचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥