भजनी मालिका

भजने

येऊनियां घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत ॥१॥ राजाई तो पुढें येऊनियां बोले । देवें नवल केलें आपुले घरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां घरा बोले राजाईस । या परिसें सुवर्णासी करीं आतां ॥१॥ आजाचिये दिन ठेवीं आपुले घरीं । आपदा ती हरी प्रपंचाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देईं बाई ॥१॥ राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते स्वभावें राउळासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरीं ॥१॥ आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदातें दुरी करुं त्याची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां यम ठाकला पुढारीं । पाहे दुराचारी दुरो-नियां ॥१॥ घाबरला मनीं कोण असे नेणे । विचारितां मनीं भां-बावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां ॥१॥ तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां द्यावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥ उदईक कापड घेऊनि बाजारासी जातों । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येकलें न कंठेचि म्हणोनियां येणें । केलीं निर्माणें वो चौदाही भुवनें । गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें । पांचही महाभूतें भौतिकें भिन्नें भिन्नें वों ॥१॥ ऐसा लाघविया मायासूत्रधारी । येकला येकटाचि झाला नानाकरी । स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरीं । तो हा नंदनंदन सये बाळब्रम्हचारी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका ॥१॥ रात्री मंचकावारी पहुडतां साजणी । अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येगे नारायणी अमृत संजीवनी । चिंतितं निर्वाणीम पावें वेगीं ॥१॥ तूं माझें जीवन नाम नारायण । नित्य अनुष्ठान तुझ्या नामें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येणे आपुलिया कुपेची गुणें । माझीं पोशिली वो सर्वागजीवनें । देऊनि क्षेम अवघीं निवविली करणें । यासी काय देऊनि व्हावें म्या उत्तीर्ण वो ॥१॥ माझें जीवींचा हा जिवलग सोयरा । यासी करुनि काय पूजावें उपचारा । जें जें कीजे तो तो उपाधी पसारा । कैसेनि पावेल या निज निविकारा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा