भजनी मालिका
← भजनांकडे परत

येगे माझे विठाबाई कृपादृष्टीने तूं पाही

yege majhe vithabai krupadrushtine tun pahi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येगे माझे विठाबाई कृपादृष्टीने तूं पाही॥१॥ तुजविण न सुचे कांहीं। आतां मी वो करूं कांहीं ॥२॥ माझा भाव तुजवरी आता रक्षी नानापरी ॥३॥ येई सखये धांडनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥