भजनी मालिका
← भजनांकडे परत

येगे नारायणी अमृत संजीवनी । चिंतितं निर्वाणीम पावें वेगीं

yege narayani amrut sanjivani | chintitan nirvanim paven vegin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येगे नारायणी अमृत संजीवनी । चिंतितं निर्वाणीम पावें वेगीं ॥१॥ तूं माझें जीवन नाम नारायण । नित्य अनुष्ठान तुझ्या नामें ॥२॥ बाह्य अभ्यंतरीं तूंचि सर्वांठायीं । तुजविण सृष्टि शून्य दिसे ॥३॥ चाल लवलाह्या कृपाळू तूं माये । मज हें न साहे मोह जंजाळ ॥४॥ तुटेल बिरडें सुटतील गांठी । जंव तूम जगजेठी नये माये ॥५॥ नामा म्हणे धन्य तुझेम नाम साचें । उच्चारितां वाचे निवती अंगें ॥६॥