भजनी मालिका

भजने

आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥ सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु॥ काय लाभ झाला काय होते केणे । काय काय कोणे सांठविले॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥ कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥ पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥ काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी पुसेन तें सांगा रे उमाणें । तुम्ही आलेती कोठुनी जाणें कोठें ॥१॥ मग विचारती गोवळ म्हणती नेणों मूळ । ऐसेचि आम्ही आढळ दास तुझे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥ माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥ गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा