भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा

atan majhya bhava | antaray nako deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥ आले भागा ते करितों । तुझे नाम उच्चारितों ॥ध्रु.॥ दृढ माझेमन। येथे राखावे बांधोन ॥२॥ तुका म्हणे वाटे । नका फुटों देऊं फांटे॥३॥