भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझिया भक्तिभावा । पालटा देवा नेदावा

atan majhiya bhaktibhava | palata deva nedava

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां माझिया भक्तिभावा । पालटा देवा नेदावा ॥१॥ मग मी नाचेन कीर्तनमेळीं । नामावळी आळवित ॥२॥ ओवाळूनि सांडीन काया । वरुनि पायां जीवप्राण ॥३॥ निळा म्हणे वाढतां प्रेमा । पुरुषोत्तमा करावा ॥४॥