भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मी पुसेन तें सांगा रे उमाणें । तुम्ही आलेती कोठुनी जाणें कोठें

atan mi pusen ten sanga re umanen | tumhi aleti kothuni janen kothen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां मी पुसेन तें सांगा रे उमाणें । तुम्ही आलेती कोठुनी जाणें कोठें ॥१॥ मग विचारती गोवळ म्हणती नेणों मूळ । ऐसेचि आम्ही आढळ दास तुझे ॥२॥ म्हणतो नंदाच्या पोसण्या । दारसुण्या दासाच्या ॥३॥ जेथूनि तुझें येणें तेथुनि आमुचें जीणें । जाशील तेव्हां जाणें तुजचि संगे ॥४॥ निळा म्हणे ऐकोनियां संतोषले हरी । म्हणती यारे यावरी खेळ खेळों ॥५॥