भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी

atan majha sarvabhaven ha nirdhar | na karin vichar anikansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥