भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां यावरि संदेहपुरीं । नका श्रीहरी लोटूं मज

atan yavari sandehapurin | naka shrihari lotun maj

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां यावरि संदेहपुरीं । नका श्रीहरी लोटूं मज ॥१॥ लाऊनियां आपुलिये कासे । न्या भलतैसे परपारा ॥२॥ कर्माची तो न कळे गती । नेणो पावविती कोण्या ठाया ॥३॥ निळा म्हणे तुमचे हातीं । आहे श्रीपति मोकळिक ॥४॥