भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा

atan mi sarvatha navhen ga durbal | yatihinakul dainyavana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥ माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥ बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥२॥ दृष्ट नव्हों आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥ संवसार आम्हां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥४॥ तुका म्हणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥