भजनी मालिका

भजने

मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥ आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी ॥१॥ माझियाकारणें पुरविलें धन । केलें माझें संरक्षण मायबाप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मायबाप सवें नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते ॥१॥ म्हणवुनि लाभ काय तो विचारी । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायबापाची ते सांडुनियां आस । धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥१॥ झणीं पांडुरंगा उपेक्षिसी मातें । तरी हांसतील तूंतें संतजन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायबापापुढें लाडीकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥ कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥ सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायबापें काय नसती आमुचीं । लेंकरें आमचीं त्याचे हातीं ॥१॥ माझें देईं माझ्या हातीं लवलाही । होईं उतराई केशीराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायबापें जरी सर्पीण कि बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम