भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां

mayabap kariti chinta | por naike sangatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥१॥ नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥ वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥२॥ कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥३॥ आम्हां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥ तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥