भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापापुढें लाडीकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें

mayabapapudhen ladiken lenkarun | taise bol karun kavatuken

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायबापापुढें लाडीकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥ कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥ नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कवळिती ॥२॥ तुका म्हणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे तैसें ॥३॥