भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा

mayabapachiye bheti | avaghya tuti sankocha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥ भोगिलें तें आहे सुख । आतां मुख मोकळें ॥ध्रु.॥ उत्तम तें बाळासाठी । लावी ओठीं माउली ॥२॥ तुका म्हणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥३॥